सिल्लोड नगरपरिषदेच्या वार्ड रचनेबाबत भाजपचे निवेदन; निवडणूक आयुक्त वाघमारे यांची भेट
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि. १५ जुलै :– सिल्लोड नगरपरिषदेची वार्ड रचना नीट व नियोजनबद्ध व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी सिल्लोडच्या शिष्टमंडळाने आज मुंबई येथे राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेशजी वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात सिल्लोड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून न्याय्य आणि समतोल वार्ड रचना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रचना व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने केली जाईल, असे आश्वासन दिले.
या वेळी भाजपचे नेते सुरेश बनकर, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंदजी कोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष मनोज मोरेल्लू, कमलेश कटारिया, विष्णू काटकर आदी उपस्थित होते.
सिल्लोडकरांच्या हितासाठी भाजपची भूमिका ठाम आणि प्रयत्नशील!