२ लाख १९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह जप्त; MIDC पैठण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

२ लाख १९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह जप्त; MIDC पैठण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
२ लाख १९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह जप्त; MIDC पैठण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र वाणी 

पैठण दि. २० :- MIDC पैठण पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत किराणा सामानाच्या आड लपवून नेला जात असलेला प्रतिबंधित गुटखा गाडीसह जप्त केला आहे. या कारवाईत २,१९,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना छत्रपती संभाजीनगर–पैठण मार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनचालकाने आपले नाव नागेश रामनाथ लांडे (वय ३३, रा. पाटेगाव, ता. पैठण) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता वरून किराणा सामान दिसून येत होते. मात्र चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सामान खाली उतरवून तपासणी केली असता किराण्याच्या खाली मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा लपवून ठेवलेला आढळून आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून न्यायालयाकडून १ दिवसाची पोलीस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

सपोनि ईश्वर जगदाळे, पोउपनि बुरकूल, पोको गुडेकर (२३७), पोको उगले (२३५) यांनी यशस्वीपणे पार पाडली.

👉 कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांची नजर कायम – अवैध गुटखा व्यवसायावर कारवाई आणखी तीव्र होणार!