पदवीधर मतदार नोंदणीवर भर : आमदार संजय केनेकर यांची शिक्षण मंडळाला सदिच्छा भेट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि.२४ :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. संजयजी केनेकर यांनी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान विभागीय अध्यक्ष श्री. अनिल साबळे, निवृत्त शिक्षणाधिकारी मा. म. के. देशमुख सर तसेच विभागीय मंडळाचे सचिव श्री. रमेश वाणी यांची उपस्थिती होती.
भेटीच्या प्रसंगी शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल, सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण चर्चा करण्यात आली. विशेषतः पदवीधर मतदार नोंदणी या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर विचारविनिमय झाला. या माध्यमातून जनजागृती वाढवणे, नोंदणी प्रक्रियेला गती देणे आणि अधिकाधिक पात्र मतदारांचा लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
👉 लोकशाही बळकट करण्यासाठी शिक्षण आणि जनजागृतीची सांगड अधिक मजबूत होत असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.