“मोफत लॅप्रोस्कोपिक कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिर - महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुरक्षित आणि परिणामकारक सुविधा’’
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने आज दि. 19/12/2025 रोजी सिल्कमिल कॉलनी महानगरपालिका रुग्णालयात मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबीरामध्ये 11 महिलांची दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली, सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. तसेच आत्तापर्यंत लॅप्रोस्कोपी शिबिरांच्या माध्यमातून एकूण 90 महिलांवर मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि यापुढेही महानगरपालिकेच्या पाच रुग्णालयांमधून (सिडको एन-8, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, सिडको एन -11) नियमितपणे लॅप्रोस्कोपीक स्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी सिल्क मिल कॉलनी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यामध्ये डॉ.गोविंद नरवणे, डॉ. पंडीत शिरसाट, डॉ. विजय दवंडे, डॉ. डिंपल परदेशी, डॉ. कल्पना राठोड, डॉ. सूर्यकुमार ठाकूर, डॉ. सौरभ सरनाईक, बेबीनंदा झांबरे, ज्योती अमोलिक, आनंद बेंद्रे, अंकिता सदाशिवे, वर्षा सोनवणे, सारिका कुलकर्णी, सविता दिवेवर, ज्योती जगदाळे, अर्चना डुकरे, विजयमाला करडकर, आसमा शेख, प्राजक्ता लांजेवार, ज्योती पवार, वंदना वडाळे, आनंद कांबळे इत्यादी सर्वांच्या उत्तम समन्वयामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.