महानगरपालिका आरोग्य विभागाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त दोन महिन्यात बिनटाक्याच्या दुर्बिणीतून (लॅप्रोस्कोपिक) कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचे शतक पूर्ण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ :- महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत कुटुंबनियोजन उपक्रमांतर्गत मोठी झेप घेत दोन महिन्यांच्या अल्प कालावधीत बिनटाक्याच्या दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचा शंभरीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
दि 28.10.25 रोजी महानगरपालिकेच्या सिल्कमिल कॉलनी रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपीक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चे उद्घाटन करण्यात आले. त्याअनुषंगाने सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनी, सिडको N8 रुग्णालय येथे शिबिर घेऊन 100 महिलांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आले. तसेच आज दि. 02/01/2026 रोजी सिडको एन -11 महानगरपालिका रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उजवला भांबरे, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. गोविंद नरवणे, डॉ. पंडित शिरसाठ, डॉ. विजय दौंडे, डॉ. सुरज जाधवर, डॉ. मनोज बजाज, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. सुमय्या, डॉ. कल्पना राठोड, वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी, मनोज पाटील, पी एच एन मीना आढाव, इन्चार्ज सिस्टर नंदा बागुल, वर्षा सोनवणे, अश्विनी साळवे, ज्योती तारु, मंगल भालेराव, ज्योती बनकर, वर्षा लोळगे, मनीषा ब्राह्मणे, कौशल्य गाडे, प्रीती सोनवणे, संगीता ढेपे, योगिता भिसे, आनंद बेंद्रे, अंकिता सदाशिव तसेच सर्व परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
या शिबीरामध्ये 10 महिलांची दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. तसेच आत्तापर्यंत लॅप्रोस्कोपी शिबिरांच्या माध्यमातून एकूण 110 महिलांवर मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सर्व डॉक्टर्स, इंचार्ज सिस्टर, स्टाफ नर्स, एलटी, आरसी, आशा वर्कर, अटेंडेट व सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्या मुळे सर्वांमध्ये कार्य करण्याचा उत्साह अधिक वाढला.
यापुढेही महानगरपालिकेच्या पाच रुग्णालयांमधून (सिडको एन-8, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, सिडको एन -11) नियमितपणे लॅप्रोस्कोपीक स्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्त्राव, लवकर बरे होणे व अल्प कालावधीत घरी परतण्याचा फायदा मिळत आहे. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम महत्वाचा ठरत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.