UMMEED पोर्टल डेटा अपलोडची मुदत वाढवा” — खासदार बजरंग सोनवणे यांची केंद्रीय मंत्र्याकडे मागणी; मुस्लिम संघटनांना पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन

UMMEED पोर्टल डेटा अपलोडची मुदत वाढवा” — खासदार बजरंग सोनवणे यांची केंद्रीय मंत्र्याकडे मागणी; मुस्लिम संघटनांना पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन
UMMEED पोर्टल डेटा अपलोडची मुदत वाढवा” — खासदार बजरंग सोनवणे यांची केंद्रीय मंत्र्याकडे मागणी; मुस्लिम संघटनांना पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

नवी दिल्ली / बीड – ४ डिसेंबर :- बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते मा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री माननीय किरेन रिजिजू यांची भेट घेऊन महत्त्वाचे निवेदन सादर केले. या निवेदनात UMMEED पोर्टलवर वक्फ मालमत्तांचा डेटा अपलोड करण्यासाठीची अंतिम मुदत तातडीने वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

खासदार सोनवणे यांनी सांगितले की—

देशभरातील अनेक मशिदी, कब्रिस्तान, दर्गे तसेच इतर वक्फ मालमत्ता आजही पोर्टलवर नोंदवायच्या बाकी आहेत. पोर्टलवरील तांत्रिक अडथळे, धीमे सर्व्हर, लॉगिन समस्या यांमुळे सर्वसामान्यांना तसेच वक्फ समित्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अंतिम मुदत वाढ न झाल्यास हजारो मालमत्तांचा डेटा प्रलंबित राहू शकतो.

यासंदर्भात सोनवणे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधून घेत “डेटा अपलोड प्रक्रियेतील तांत्रिक समस्या दूर कराव्यात आणि अंतिम मुदत वाढवून सामान्यांना दिलासा द्यावा” अशी ठाम मागणी केली.

मुस्लिम संघटनांना महत्त्वाचे आवाहन

खासदार बजरंग सोनवणे यांनी देशातील प्रमुख मुस्लिम संस्थांना —

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमिअत ए उलेमा-ए-हिंद —

यांना आवाहन केले आहे की त्यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मुदतवाढीचा तोडगा काढावा.

त्यांनी सांगितले की—

“ही समस्या केवळ तांत्रिक नसून लाखो लोकांच्या धार्मिक-मालमत्ता अधिकारांशी संबंधित आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांकडे सविस्तर मांडणी करावी.”

खासदार सोनवणे यांचे आभार

वक्फ मालमत्तांच्या सुरक्षेसाठी आणि तांत्रिक प्रक्रियेत जनतेला मदत व्हावी म्हणून प्रयत्नशील राहिल्याबद्दल स्थानिक वक्फ समिती सदस्य व नागरिकांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

“वक्फ संरक्षणासाठी एकत्र आवाज — उपाय आता केंद्राच्या court मध्ये!”