जिल्हा मराठी पत्रकार संघाअंतर्गत पैठण तालुका पत्रकार संघाच्या स्नेहमिलन व प्रीतीभोजन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र वाणी न्युज
पैठण, २३ जुलै :- छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत पैठण तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन आणि प्रीतीभोजन कार्यक्रम दिनांक २२जुलै ला मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूखी वातावरणात पार पडला. हॉटेल दुर्गा रेस्टॉरंट, पैठण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध पत्रकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष गजानन पाटील आवारे, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब गलांडे, मुफीद पठाण व रमेश शेळके यांनी संयुक्तपणे केले होते.
विशेष उपस्थिती:
कार्यक्रमास दैनिक पुढारीचे मराठवाडा आवृत्ती संपादक आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद काकडे, अप्पासाहेब गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांचा सत्कार पैठण तालुकाध्यक्ष गजानन पाटील आवारे यांनी केला. आपल्या भाषणात काकडे सरांनी पत्रकारांमध्ये वाढत असलेली एकता आणि संघटनेची उंचावलेली प्रतिमा याबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच सर्व पत्रकारांसाठी जीवन विमा योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
गौरव समारंभ:
या कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य, हबीब पठाण, दादासाहेब गलांडे, हसनभाई चाऊस, मुफीद पठाण, चंद्रकांत आंबीलवादे, रमेश शेळके, तुषार नाटकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेचे श्रेय
तालुकाध्यक्ष गजानन पाटील आवारे यांच्यासह पत्रकार दादासाहेब गलांडे, मुफीद पठाण, रमेश शेळके, तुषार नाटकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभारप्रदर्शन मुफीद पठाण यांनी केले.
एकत्र येण्याची हीच तर खरी वेळ… पत्रकार संघटनेच्या बळकटीसाठी सुरूवात सकारात्मक!