गांजा विक्रीवर पोलिसांचा घाव! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्रीवर पोलिसांचा घाव! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.२३ :- स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत गांजा व मोटारसायकल असा एकूण १,५०,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दादासाहेब परसराम मोईन (वय ४५), रा. चिंचडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर हा आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गांजा विक्रीच्या उद्देशाने वीरगाव फाटा परिसरात गांजा बाळगून आहे.

ही गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपूत (स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवून परवानगी घेतली व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवन इंगळे यांना पथकासह कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने वीरगाव फाटा येथे सापळा रचून छापा टाकला असता, सदर इसम त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवरून गांजा विक्री करण्याच्या तयारीत आढळून आला. झडतीदरम्यान आरोपीकडून गांजा व मोटारसायकल असा एकूण १,५०,८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस ठाणे वीरगाव येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर श्री. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपूत, स.पो.नि. श्री. पवन इंगळे, पोहे विष्णू गायकवाड, अंगद तिडके, अनिल काळे, महेश बिरुटे तसेच पोलीस ठाणे वैजापूरचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित ताईतवाले व पोलीस ठाणे वीरगावचे पोउपनि श्री. माने यांनी सहभाग घेतला.

👉 अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देणारी ठरत आहे.