माजी नगरसेवक अरुण बोर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; प्रभाग १५ मधून लढवणार निवडणूक

माजी नगरसेवक अरुण बोर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; प्रभाग १५ मधून लढवणार निवडणूक
माजी नगरसेवक अरुण बोर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; प्रभाग १५ मधून लढवणार निवडणूक

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- शहरातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून माजी नगरसेवक अरुण बोर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी करणार आहेत.

या पक्षप्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी अरुण बोर्डे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनुभवी नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील मजबूत जनसंपर्क यामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अरुण बोर्डे हे यापूर्वी काही काळ MIM पक्षातही सक्रिय होते. मात्र शहराच्या विकासासाठी आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच योग्य व्यासपीठ असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील मगरे, श्री. अनुराग शिंदे, श्री. प्रकाश मते, श्री. नितीन धुमाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

शहरातील राजकारणात नवे समीकरण आकाराला येत असून, प्रभाग १५ मधील निवडणूक आता अधिकच रंगतदार ठरणार आहे.