आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी इकरा थीम महाविद्यालयातील पाच खेळाडूंची निवड
महाराष्ट्र वाणी
जळगाव, दि. १२ :- या वर्षी होणाऱ्या आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी इकरा शिक्षण संस्था, जळगाव द्वारा संचालित एच. जे. थीम महाविद्यालयातील पाच हॉकी खेळाडूंची निवड झाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. हे खेळाडू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये प्रणव बरेला (FY B.Sc.), विजय बरेला (FY B.Sc.), समीर खान (FY B.A.), दानिश खान (TY B.Sc.) आणि मोईन खान (FY B.A.) यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांद खान यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटी, जळगावचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाज मलिक, अमीन भाई बादलीवाला, अ. रशीद शेख तसेच इतर मान्यवर सदस्यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वकार शेख, उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उल्लेखनीय आहे की आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेचे आयोजन एल.एन.सी.टी.ई., ग्वालियर येथे दिनांक १२ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
— महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील अभिमानास्पद क्षण!