वेदांत नगर पोलिसांची तत्परता; चोरीस गेलेले ५३ हजारांचे सोने मूळ मालकाच्या ताब्यात!

वेदांत नगर पोलिसांची तत्परता; चोरीस गेलेले ५३ हजारांचे सोने मूळ मालकाच्या ताब्यात!
वेदांत नगर पोलिसांची तत्परता; चोरीस गेलेले ५३ हजारांचे सोने मूळ मालकाच्या ताब्यात!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :-

पोलीस ठाणे वेदांत नगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 187/2023, कलम 379 भा.द.वी. अंतर्गत दाखल चोरी प्रकरणात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने अखेर मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

या प्रकरणात चोरीस गेलेल्या

🔹 ५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी

🔹 ४.२९० ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी

असा एकूण ५३,५९३ रुपये किमतीचा मुद्देमाल माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार (जा. क्र. 264/2026, दि. 14/01/2026) परत करण्यात आला.

आज रोजी दोन पंचांच्या समक्ष, पोलीस निरीक्षक पोस्ट वेदांत नगर श्रीमती प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुद्देमाल मोहरीर सोनवणे व शेख यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ अर्जदार आकाश बापूराव साठे व त्यांचे वडील बापू बाबुराव साठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या कारवाईमुळे वेदांत नगर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

👉 पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे चोरीचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळणे हे नागरिकांसाठी दिलासादायक ठरले आहे.