गुणवंतांचा सत्कार अन् मोफत वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम!
महाराष्ट्र वाणी न्युज
कालकथित तुकाराम धेंडे प्रतिष्ठान व अखिल मंगळवार पेठ पुणे यांचा संयुक्त उपक्रम
पुणे प्रतिनिधी दि १६ जून :- कालकथित तुकाराम धेंडे प्रतिष्ठान आणि अखिल मंगळवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये एक स्तुत्य उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले, तसेच दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी, माजी नगरसेवक मुख्तार शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात सुमारे 1000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते विकार अहमद, मुख्तार शेख, निनाद धेंडे, जहीर शेख व झाकीर शेख यांनी केले होते.