अल्पसंख्यक सशक्तिकरणाला गती! १५-सूत्रीय कार्यक्रमासाठी जिल्हा अल्पसंख्यक कल्याण समितीचे पुनर्गठन – प्यारे खान यांच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्र वाणी 

मुंबई (प्रतीनीधी) दि २० :- अल्पसंख्यक समाजाच्या सशक्तिकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री १५-सूत्रीय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरीय अल्पसंख्यक कल्याण समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या नव्या रचनेनुसार, आता जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी निवासी उपजिलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार आहे.

या बदलामुळे निर्णय प्रक्रियेत वेग येणार असून प्रशासन, लोकप्रतिनिधी व अल्पसंख्यक समाज यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. समितीत जनप्रतिनिधी, विविध प्रशासकीय अधिकारी तसेच अल्पसंख्यक कल्याणाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे योजनांचा अंमलबजावणीचा प्रवास अधिक समावेशक व परिणामकारक ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, अल्पसंख्यक समाजाच्या हितासाठी त्यांनी सातत्याने शासनाशी संवाद साधून या पुनर्गठनाची मागणी केली होती.

“ही पुनर्गठित समिती अल्पसंख्यकांच्या अधिकारांचे संरक्षण करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देईल. केवळ योजना आखणे नव्हे, तर त्या प्रत्यक्षात राबवून अल्पसंख्यक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.