समाजहितासाठी माऊली हॉस्पिटल व जनविकास फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!लोहारा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

समाजहितासाठी माऊली हॉस्पिटल व जनविकास फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!लोहारा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन
समाजहितासाठी माऊली हॉस्पिटल व जनविकास फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!लोहारा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र वाणी 

लोहारा दि २५ :- ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवा पोहोचावी या उदात्त हेतूने माऊली हॉस्पिटल शेगांव व जनविकास फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लोहारा येथील जीवन केअर क्लिनिक, जामा मस्जिदच्या बाजूला, ग्रामपंचायत रोड येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये बी.पी., शुगर व ई.सी.जी. तपासणी पूर्णतः मोफत करण्यात येणार असून सर्दी, खोकला, ताप, टायफॉईड, मलेरिया, न्यूमोनिया, डेंग्यू, त्वचारोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे आजार, आम्लपित्त, गुडघेदुखी, मुतखडा, किडनी विकार तसेच इतर सर्व सामान्य आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

विशेष म्हणजे या शिबिरात निःशुल्क बायपास, एन्जीओप्लास्टी व डायलेसीस यासारख्या महागड्या उपचारांविषयी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या आरोग्य शिबिरासाठी विविध क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये

डॉ. विजय जैस्वाल (M.B.B.S, MD – Medicine),

डॉ. आशिष चांडक (M.B.B.S, M.S, M.Ch – Urology),

डॉ. पूजा चांडक (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ),

डॉ. अतुल पाटील (नेत्ररोग तज्ञ),

डॉ. जोहेब पटेल (जनरल सर्जन, पटेल हॉस्पिटल शेगाव),

डॉ. अक्षय तायडे (M.B.B.S, MD – Pediatrics)

यांचा समावेश आहे.

या समाजोपयोगी उपक्रमाचे संयोजन डॉ. जमील देशमुख व डॉ. शेख अफरोज (जनविकास फाऊंडेशन, ट्रस्टी) यांनी केले असून नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7773954777 / 9422713725 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

👉 आरोग्य हीच खरी संपत्ती — आणि ही संपत्ती जपण्यासाठी समाज एकत्र आला आहे!