सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

उंच मानेने जगायचे असेल तर शिक्षणच एकमेव मार्ग — सादीक शेख सर

सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन
सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

महाराष्ट्र वाणी 

नगरदेवळा (ता. पाचोरा) दि ७ :- सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२५ रोजी आदरपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मुख्य वक्ते म्हणून बोलताना उपक्रमशील शिक्षक सादीक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत म्हटले की, “उंच मानेने जगायचे असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण जीवनात उतरवली, तर प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.”

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती मनिषा जाधव मॅडम यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्काऊट-गाईड विभाग प्रमुख जी. यू. पवार सर उपस्थित होते. पवार सरांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी सादीक शेख सर यांनी प्रेरणादायी मनोगत मांडले. तसेच पी. आर. तायडे सर आणि इकबाल शेख सर यांनी कविता व गीत सादर करून कार्यक्रमाला एक वेगळा भावस्पर्शी रंग दिला. मराठी आणि उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली. तायडे सर लिखित आणि अमोल सर संगीतबद्ध गीताचे सादरीकरणही कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन समाधान ठाकूर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश सोनवणे सर यांनी व्यक्त केले.

शेवटी भाषण व गीतांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ शिक्षक सैय्यद जाकीर अली सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“शिक्षणाची वाटचालच उंच भरारीची पहिली पायरी—अशा प्रेरणादायी क्षणांचा मागोवा फक्त ‘महाराष्ट्र वाणी’वर.”