उंडणगाव सर्कलमध्ये भाजपाला जबर धक्का! माजी सरपंच कल्पनाबाई सोनवणे शिवसेनेत; सत्ता परिवर्तन अटळ
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि १८ :- उंडणगाव सर्कलमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विजयाची खात्री मानली जात असलेली ही लढत आता थेट शिवसेनेच्या बाजूने झुकताना दिसत आहे. उंडणगावच्या माजी सरपंच कल्पनाबाई सोनवणे यांनी भाजपाला रामराम ठोकत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून कल्पनाबाई सोनवणे यांच्याकडे वैध जात प्रमाणपत्र उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या गटासाठी भाजपाकडे सध्या कोणताही सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून निवडणुकीच्या मैदानात शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उंडणगाव सर्कलमध्ये अधिक बळकट झाली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “भाजपाला धक्का, उंडणगाव शिवसेनेच्या ताब्यात” अशी चर्चा आता जनतेत रंगू लागली आहे.
या घडामोडींमुळे उंडणगाव सर्कलमध्ये सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे संकेत मिळत असून आगामी निवडणूक शिवसेनेसाठी विजयाची ग्वाही देणारी ठरेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
👉 उंडणगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, आता निकालाची घडी शिवसेनेच्या बाजूने फिरताना दिसत आहे!