‘साखरपुडा ते निकाह’ – कादर मोटर कुटुंबीयांनी दिला साधेपणाचा समाजपाठ!

या सामाजिक उपक्रमाचे हुफ्फाझ फाउंडेशन व एकता संघटनेतर्फे विशेष कौतुक करण्यात आले

‘साखरपुडा ते निकाह’ – कादर मोटर कुटुंबीयांनी दिला साधेपणाचा समाजपाठ!
‘साखरपुडा ते निकाह’ – कादर मोटर कुटुंबीयांनी दिला साधेपणाचा समाजपाठ!

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव, १४ जुलै :– श्रीमंतीतही साधेपणाने समाजाला दिशा देणारा आदर्श निर्माण करत जळगावमधील प्रसिद्ध कादर मोटर कुटुंबीयांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. शहरातील उच्चशिक्षित व प्रतिष्ठित म्हणून ओळखले जाणारे हे चार भावंडांचे कुटुंब, आपल्या मुलाच्या साखरपुड्यालाच लग्नात रूपांतर करत ‘सामाजिक जबाबदारी’ कशी पेलावी, याचे उत्तम उदाहरण ठरले.

हबीब कादर हे आपल्या मुलगा दानिश शेखसाठी फैजपूर येथे मशिरा शेख हिच्यासोबत साखरपुड्यासाठी गेले होते. दोन्ही बाजूचे नातेवाईक उपस्थित असताना कादर मोटरतर्फे अमानुल्ला खान यांनी त्याच दिवशी निकाह लावण्याचा प्रस्ताव ठेवला. परिवारातील एकमत व मौलाना अनस यांच्या मार्गदर्शनात त्याच दिवशी निकाह पार पडला.

या सामाजिक उपक्रमाचे हुफ्फाझ फाउंडेशन व एकता संघटनेतर्फे विशेष कौतुक करण्यात आले. फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली, मुफ्ती अतिकूर रहमान, हाफिज रहीम पटेल, मीर नाझीम अली यांनी नवविवाहितांचे अभिनंदन करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याचे गौरवोद्गार काढले.

📸 फोटो वर्णन:

मुफ्ती अतिकूर रहमान नवविवाहितांचे अभिनंदन करताना, सोबत फारुक शेख, अमानुल्ला खान, सलीम इनामदार, मीर नाझीम व कादर मोटरचे सर्व बंधू.

👉 हजारोंच्या खर्चाला फाटा देत साधेपणात पार पडलेले हे विवाहसोहळे समाजासाठी आजच्या काळात एक मार्गदर्शक ठरावेत!