मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा सामाजिक पुढाकार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल 1 कोटींचा हातभार

महाराष्ट्र वाणी 

नागपूर, दि. ८ :- राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटाने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक जाणिवेतून मोठा पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल रु. 1 कोटींचा निधी जमा केला आहे.

हा धनादेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आमदार सतीश चव्हाण यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार विक्रम काळेही उपस्थित होते.

1958 साली स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दातृत्वातून तसेच स्व. विनायकराव पाटील आणि स्व. दादासाहेब सावंत यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

भूकंप, महापूर, दुष्काळ, कोविड यांसारख्या अनेक आपत्तींच्या काळात मंडळाने नेहमीच स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी मंडळाने यावेळीही “खारीचा वाटा” उचलत समाजाप्रती असलेली जबाबदारी समर्थपणे निभावली आहे.

ज्ञानदानासोबत सामाजिक कर्तव्य निभावणाऱ्या म.शि.प्र. मंडळाच्या या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक!