ग्राहक हक्कांसाठी पुन्हा एक जबाबदारीची संधी; संतोष पारखी यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अविनाश झोटिंग यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली.

ग्राहक हक्कांसाठी पुन्हा एक जबाबदारीची संधी; संतोष पारखी यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
ग्राहक हक्कांसाठी पुन्हा एक जबाबदारीची संधी; संतोष पारखी यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

महाराष्ट्र वाणी 

चंद्रपूर (प्रतिनिधी) दि १५ जुलै :– भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी श्री. संतोष दशरथ पारखी यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अविनाश झोटिंग यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली.

श्री. पारखी हे शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख व शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, सामाजिक भान, कायदाविषयक जाण व ग्राहक हक्कांसाठी असलेली बांधिलकी लक्षात घेता त्यांची ही निवड सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे.

ग्राहक संरक्षण कायदा १९८६/२०१९ अंतर्गत समिती संपूर्ण भारतात कार्यरत असून, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राहक हक्क जागृतीचे काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी श्री. पारखी यांच्याकडे अधिकार सोपविण्यात आले आहेत. जिल्हा, तहसील, वॉर्ड व गावपातळीवर शाखा स्थापन करून स्वेच्छेने काम करणाऱ्या कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.

समितीमार्फत प्रशिक्षण व शिबिरांच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय, खाजगी व सहकारी संस्थांमधील कायदेशीर बाबींची माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच सदस्य व अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी श्री. पारखी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी त्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या असून, जिल्ह्यातील ग्राहकांच्या हितासाठी भक्कम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 ग्राहकांचा आवाज बुलंद करण्यासाठी एक पाऊल पुढे…!