मुकुंदवाडीतील भाजपची जाहीर सभा उत्साहात; रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत ‘विकासाचाच विजय’चा निर्धार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४, मुकुंदवाडी येथे भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा प्रचंड उत्साहात आणि जनसमर्थनाच्या घोषणांमध्ये पार पडली. या सभेस माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश व ऊर्जा निर्माण केली.
यावेळी आमदार मा. नारायण कुचे, आमदार मा. सौ. अनुराधाताई चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री. राधाकिसन बापू पठाडे, श्री. रामभाऊ शेळके यांच्यासह प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार — गंगाबाई भिमराव भवरे, सौ. कमलताई रामचंद्र नरोटे, सौ. मुक्ताबाई किसन ठुबे आणि श्री. सुनील देविदास जगताप — यांची ठाम उपस्थिती होती.
सभेत विरोधकांच्या अपयशावर जोरदार प्रहार करत, “विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाचे खरे प्रतीक म्हणजे भारतीय जनता पार्टी” असे ठासून सांगण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत, मुकुंदवाडी व संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद फक्त भाजपमध्येच असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये विकासाची गती वाढवण्यासाठी प्रामाणिक व कार्यक्षम नेतृत्वाला संधी देत, सर्व मतदारांनी भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी “भाजपचा विजय असो!” अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
*जनविश्वास आणि विकासाच्या बळावर मुकुंदवाडीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा संदेश या सभेतून ठळकपणे उमटला