दोन दशके सेवा, शंभर टक्के समर्पण! गरजू विद्यार्थ्यांसाठी मणियार बिरादरीकडून मोफत गणवेश वाटप; २५० विद्यार्थ्यांचे हसते चेहरे

दोन दशके सेवा, शंभर टक्के समर्पण! गरजू विद्यार्थ्यांसाठी मणियार बिरादरीकडून मोफत गणवेश वाटप; २५० विद्यार्थ्यांचे हसते चेहरे
दोन दशके सेवा, शंभर टक्के समर्पण! गरजू विद्यार्थ्यांसाठी मणियार बिरादरीकडून मोफत गणवेश वाटप; २५० विद्यार्थ्यांचे हसते चेहरे

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव दि १७ जुलै :- गेल्या २० वर्षांपासून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी मिळावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा मणियार बिरादरी निस्वार्थ सेवा देत आहे. मदरसा अन्वरुल उलूम मेहरूनच्या हजरत शेख उल हिंद उर्दू प्राथमिक शाळेत या वर्षीही २५० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष फारूक शेख म्हणाले, "आर्थिक अडचणींमुळे कोणतीही मुलं शिक्षणापासून दूर राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते."

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुश्ताक कारी साहिब, तर प्रमुख पाहुणे म्हणून फारूक शेख, उपाध्यक्ष सय्यद चांद, सहसचिव अब्दुल रऊफ टेलर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता ५वीतील झुलकर नैन यांच्या कुराण पठणाने झाली, तर इयत्ता ६वीतील सफूरा हिने नात सादर केली.

सूत्रसंचालन अर्शद शेख, आभार प्रदर्शन रुबीना रईस यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक जानिसार अख्तर यांनी दरवर्षी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल बिरादरीचे आभार मानले. या सेवेमुळे हजारो विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक जानिसार अख्तर, अर्शद शेख, शिरीन शेख, रुबीना रईस, नजीरुद्दीन काझी, पठाण हमीद खान, शाहिद अहमद यांनी कार्यक्रमाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

गणवेश मिळाल्यावर आनंदलेल्या विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे, हा सामाजिक एकतेचा आणि सेवाभावाचा जिवंत पुरावा ठरला.

शेवटी एवढंच म्हणावं लागेल – शिक्षणाचा खरा अर्थ समजून त्यासाठी झटणारी माणसं अजूनही समाजात आहेत, हेच मणियार बिरादरीच्या सेवेमुळे अधोरेखित होतं.