नगरदेवळ्याचे सैय्यद जाकीर सर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित – पाचोर्‍यात उत्साहात सत्कार

नगरदेवळ्याचे सैय्यद जाकीर सर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित – पाचोर्‍यात उत्साहात सत्कार
नगरदेवळ्याचे सैय्यद जाकीर सर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित – पाचोर्‍यात उत्साहात सत्कार

महाराष्ट्र वाणी 

पाचोरा, दि. ६ (प्रतिनिधी : सय्यद दानीश)

नगरदेवळा येथील प्रख्यात समाजसेवक आणि शिक्षक सैय्यद जाकीर सर यांनी आपल्या कार्याच्या जोरावर प्रतिष्ठित माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री व कवयित्री सरोजिनी नायडू राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिलशाह फारुकी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा मानला जातो.

या यशाबद्दल पाचोरा शहरात जाकीर सरांचा यशोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आशीर्वाद फ्रूट कंपनीचे मालक हाजी हबीब सेट, तसेच सामाजिक कार्यकर्ते अफजल खान, आसिफ अली, मुना बेग, अजीज भाई उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आशीर्वाद फ्रूट कंपनीचे संचालक रईस खान यांच्याद्वारे करण्यात आलेला जाकीर सरांचा सन्मान.

सत्कार प्रसंगी मान्यवरांनी जाकीर सरांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन, मूल्याधारित शिक्षण व समाजकार्यातील सातत्यपूर्ण सहभागामुळे त्यांचे हे कार्य राज्यस्तरावर गौरवले जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमानंतर स्थानिक नागरिकांनीही सैय्यद जाकीर सर यांना अभिनंदनाचा वर्षाव केला असून नगरदेवळा परिसरात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.