गांधी भवनात अल्पसंख्याक काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा; अहमद खान, डॉ. वजाहत मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ जुलै :– शहर व जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी भवन, शहाणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला असून जिल्हा व शहरातील शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले.
या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्राचे प्रभारी मोहम्मद अहमद खान, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंचावर इब्राहिम पठाण, खालिद पठाण, शेख कैसर, आजाद गुलाब पटेल, अॅड. एकबालसिंग गिल, बबन इंजिनिअर, इफ्तेखार डॉ. अरुण शिरसाट, डॉ. निलेश आंबेवाडीकर, बबन दिंडोरे पाटील, मोईन कुरेशी, अनिताताई भंडारी, रेखाताई राऊत, उमाकांत खोतकर, शेख रईस, अस्मत खान, असदुल्ला, शकील, अनिल पारखे, मजाज खान, विद्याताई घोरपडे, शकुंतला साबळे, प्रवीणबाजी देशमुख, रेहाना शेख, मुदस्सिर अन्सारी, राहुल संत, सरोज जेकप, जकी मिर्झा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनिस पटेल आणि शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले होते.
महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्याने अल्पसंख्याक काँग्रेसची ताकद ठळकपणे दाखवली आहे.