लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आंदोलक,नामवंत साहित्यिक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेमध्ये अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय जितेंद्र जयस्वाल यांनी अध्यक्षीय समारोपात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजाने चालले पाहिजे,समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आयुष्यभर अण्णा भाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा पुरस्कार करत अण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला तर समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलताना त्यांनी आपल्या हयातीत "आहे रे आणि नाही रे" वर्गामध्ये जोपर्यंत समानता येत नाही;तोपर्यंत समाज सुधारणार नाही हे त्यांनी हेरल्यामुळे आयुष्यभर आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले असल्याचे विशद केले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी विजेंद्र डकले,देविदास बिरारे,बबन अरसुळ,प्रशांत पाटील,कल्पना ढाकणे,संजय वाघ,कल्याण ढोरकुले,जनार्दन चव्हाण,विनोद शेळके यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीता साळुंके -गायकवाड यांनी केले.