जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार गुणगौरव!

जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार गुणगौरव!
जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार गुणगौरव!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १३ :– "मानवसेवा हीच ईश्वरसेवा" हा वसा घेऊन समाजकार्य करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी समूहाच्या वतीने जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संयुक्त सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचा कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व गुणगौरव करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक (मार्कशीट) आयोजकांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून अनेक रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेता संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन पूजा सुमित पंडित (समाजसेविका व माणुसकी वृद्ध सेवालय संचालिका) तसेच सुमित पंडित (समाजसेवक व माणुसकी रुग्णसेवा समूह, घाटी) यांनी केले आहे.

रक्तदानासाठी इच्छुक दात्यांनी आपली नावे नोंदवावीत, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

संपर्क : 7588928822

रक्तदान हेच श्रेष्ठ दान; तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे उज्ज्वल भविष्याला दिलेली प्रेरणा आहे.

शेवटची ओळ: अशाच सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या बातम्यांसाठी वाचत रहा — महाराष्ट्र वाणी!