ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुतवल्ली विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख फैसल मुजावर यांची पुन्हा निवड

ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुतवल्ली विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख फैसल मुजावर यांची पुन्हा निवड
ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुतवल्ली विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख फैसल मुजावर यांची पुन्हा निवड

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. २२ :- ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुतवल्ली विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बीबी का मकबऱ्याचे मुतवल्ली शेख फैसल मुजावर यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी पुन्हा सोपविण्यात आल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

११ मे २०२६ रोजी ऑल इंडिया उल्मा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दीकी आणि महासचिव अल्मा बुनई हस्नी यांनी नवी दिल्ली येथील शाही मस्जिद भोगल संपर्क कार्यालयातून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबी का मकबरा येथील मुतवल्ली शेख फैसल मुजावर यांची मुतवल्ली विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर शेख फैसल मुजावर यांनी ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच बोर्डाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय कार्यकारिणीत शरिया विंग अध्यक्षपदी मुफ्ती ताहिर हुसेन मजाहिरी (नोएडा), वक्फ विंग अध्यक्षपदी सय्यद इरफान शेर (कोलकाता), लीगल सेल अध्यक्षपदी अर्श अला फरीदी (पटना), शिक्षण क्षेत्रात डॉ. झेबा मलिक (मुंबई) आणि शबाना वकील खान (मुंबई), राजकीय विंग अध्यक्षपदी संपादक बादशाह खान (रांची), राष्ट्रीय प्रस्ताव अध्यक्षपदी पत्रकार सय्यद मुजफ्फर अली (अजमेर), सूफी संत विंग अध्यक्षपदी एम.आर. स्वामी विश्व आनंदजी (अयोध्या) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच उपाध्यक्ष म्हणून अॅड. अमजद खान (लखनऊ), मुफ्ती खालिद आजम हैदरी (कोलकाता), मौलाना साबित अली, राष्ट्रीय सचिव म्हणून मौलाना नजीरुद्दीन नक्शबंदी (हैदराबाद), पत्रकार जफर फातमी, अल्हाज सुहैल पटेल अशरफी (नागपूर) आणि आयोजन सचिवपदी मौलाना रियाजुद्दीन नक्शबंदी (हैदराबाद) यांचा समावेश आहे.

👉 समाजकार्यातील योगदानाची दखल घेत शेख फैसल मुजावर यांना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाल्याने शहरात आनंद व्यक्त केला जात आहे.