राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एनएसयूआय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. शादाब शेख यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवक, विद्यार्थी, काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, गुरमीत गिल, मोईन कुरेशी, निलेश आंबेवाडीकर, इरफान पठाण, एजाज शेख, शिरीष साठे, माजिद पटेल, उमर सय्यद, मुनीर पटेल, मोहसीन खान आणि प्रतीक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सागर साळुंखे, अॅड. सय्यद अक्रम, डॉ. शादाब शेख, गुरमीत गिल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजसेवेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेत हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सेवा, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांना समर्पित ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. शादाब शेख यांनी सर्व रक्तदाते, अतिथी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशासह समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम ठरला.

वाचत रहा – महाराष्ट्र वाणी