अंभई ग्रामपंचायत कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

अंभई ग्रामपंचायत कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
अंभई ग्रामपंचायत कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र वाणी

अंभई, दि. ९ मे :- ग्रामपंचायत कार्यालय अंभई येथे आज वीर शिरोमणी Maharana Pratap Jayanti मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शेनफडू मुंढे आणि फुलसिंग पेंडसे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या विचारांना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

यावेळी पोलिस पाटील दगडू मैंद, जि. प. शाळा अंभईचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण सर, प्राध्यापक समाधान मुंढे, समाधान भुईगळ, रामदास दुतोंडे, डॉ. वडोदे, कृ. उ. बा. समिती संचालक दामू अण्णा गव्हाणे, रुद्राप्पा नगरे, माजी उपसरपंच नितीन मुंढे, सदस्य मुसा शाह, सद्दाम तडवी, राजेंद्र सोनवणे, शंकर सोनवणे, राजू पेंडसे, अजय मुंढे, विजय मुंढे, भारत मुंढे यांच्यासह गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातून युवकांनी देशप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा शिकण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

“शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या विचारांनी आजही तरुणांना प्रेरणा मिळत आहे.”