सिल्लोडमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात संपन्न; ११ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

सिल्लोडमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात संपन्न; ११ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
सिल्लोडमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहात संपन्न; ११ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि ३० :- येथे आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' मोठ्या उत्साहात पार पडले. महसूल, ग्रामविकास, कृषी, नगर परिषद, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, वन विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या योजनांअंतर्गत तब्बल ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, प्रत्येक पात्र नागरिकाला त्याचा हक्काचा लाभ मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्या पाहिजेत, असे सांगितले. प्रशासनाने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्त्वांवर काम करून लोकाभिमुख प्रशासन उभे करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते, तहसीलदार मनीषा मेने, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, अमोल जगताप, नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, भारत कासार, नायब तहसीलदार तुकाराम बनकर, बळीराम मुंडे, संभाजी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.