⚠️ महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामानाचा इशारा! वादळी वारे, विजांचा कडकडाट; अनेक जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट

⚠️ महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामानाचा इशारा! वादळी वारे, विजांचा कडकडाट; अनेक जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र वाणी

मुंबई, दि. २७ :- मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा इशारा जारी केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त केली आहे. काही भागांना यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हवामान विभागाने केले आहे.

२७ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा घाट आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२८ ते ३० जुलै दरम्यानही राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरातील जिल्ह्यांनी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना वादळी वातावरणात झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये, तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

📌 महाराष्ट्र वाणी | हवामानातील प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.