कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर! 'यादीत नाव नसले तरी चिंता करू नका'; सहकार मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर! 'यादीत नाव नसले तरी चिंता करू नका'; सहकार मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि ३० :- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यातील सुमारे १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये ७.०३ लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे, तर ९.९३ लाख शेतकरी व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. या टप्प्यात एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमाफीचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेच्या पात्रतेबाबत किंवा अंमलबजावणीसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०२ या हेल्पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.