राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुशिल बोर्डे यांची नियुक्ती; शरद पवारांच्या विचारांचा प्रचार करण्याची जबाबदारी
विद्यार्थी प्रश्नांसाठी संघर्ष आणि राज्यभर संघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी सुशिल बोर्डे यांच्या खांद्यावर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १ ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या विद्यार्थी संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली असून, सुशिल बोर्डे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. पक्षासाठी आतापर्यंत दिलेले योगदान, संघटन कौशल्य आणि विद्यार्थी प्रश्नांबाबतची भूमिका लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रात विद्यार्थी वर्गाशी संबंधित विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करण्याबरोबरच राज्यभर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची जबाबदारी सुशिल बोर्डे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल शशिकांत शिंदे यांनी सुशिल बोर्डे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुशिल बोर्डे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. छत्रपती संभांजीनागर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष अखलाख देशमुख किसान सेलचे जिल्हाध्यक्ष हरीदास शेलार व जिल्ह्यातील व शहरातील NCP शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीअभिनंदन केले आहे