ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! ‘उत्तम उपहार गृह’वर एफडीएची मोठी कारवाई; झुरळे, बुरशी, जुने तेल...

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! ‘उत्तम उपहार गृह’वर एफडीएची मोठी कारवाई; झुरळे, बुरशी, जुने तेल...
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! ‘उत्तम उपहार गृह’वर एफडीएची मोठी कारवाई; झुरळे, बुरशी, जुने तेल...

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- शहरातील गुलमंडी रोडवरील ‘उत्तम उपहार गृह’ येथे अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत समोर आले आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या अचानक तपासणीत ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.

तपासणीदरम्यान पुनःपुन्हा वापरलेले खाद्यतेल आणि वनस्पती तूप, अत्यंत अस्वच्छ स्वयंपाकघर, कीटकांचा वावर, भिंतींवर बुरशी, तसेच कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचेही अनेक प्रकारे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले.

या गंभीर बाबी लक्षात घेऊन एफडीएने संबंधित उपहारगृहाचा परवाना तात्काळ निलंबित करत आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले. जप्त करण्यात आलेले खाद्यतेल व वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

उत्तम उपहार गृह, #FDA कारवाई, #छत्रपती संभाजीनगर, #अन्न व औषध प्रशासन, #Food Safety, #Safe Food #Safe Maharashtra, #अस्वच्छ उपहारगृह, #FDA Raid