पाणीटंचाईत वंचित बहुजन आघाडीचा दिलासा; आजपासून शहरभर मोफत पाणी वाटप सुरू! नागरिकांनी लाभ घ्यावा; वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

पाणीटंचाईत वंचित बहुजन आघाडीचा दिलासा; आजपासून शहरभर मोफत पाणी वाटप सुरू! नागरिकांनी लाभ घ्यावा; वंचित बहुजन आघाडीचे आवाहन
पाणीटंचाईत वंचित बहुजन आघाडीचा दिलासा; आजपासून शहरभर मोफत पाणी वाटप सुरू! नागरिकांनी लाभ घ्यावा; वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत पाणी वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. आजपासून शहरातील पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये पक्षाच्या वतीने मोफत पाणी वाटप सुरू करण्यात आले असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या पुढाकारातून जयभवानी नगर, विश्रांतीनगर आणि राजनगर (प्रभाग क्र. २२) येथे मोफत पाणी वाटपाला सुरुवात करण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्र. १ एकतानगर (हर्सूल) येथे मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, तर प्रभाग क्र. २८ उस्मानपुरा येथे पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे यांच्या नेतृत्वाखालीही नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात पक्षाच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व शहर महासचिव किशोर बाळाजी निकाळजे, पूर्व जिल्हा महासचिव रामदास नाना वाघमारे, पूर्व महिला आघाडीच्या शहर महासचिव सुलोचना साबळे यांच्यासह प्रभाग क्रमांक २२ मधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

"जनतेच्या अडचणीच्या काळात वंचित बहुजन आघाडी सदैव सोबत"

पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा आणि कोणालाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 शहरातील पाणीटंचाईच्या संकटात वंचित बहुजन आघाडीचा हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.