मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार! मनोज जरांगे पाटलांच्या पुढील रणनितीवर उद्या शिक्कामोर्तब?

मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार! मनोज जरांगे पाटलांच्या पुढील रणनितीवर उद्या शिक्कामोर्तब?

अंतरवाली सराटी दि ११ :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची पुढील दिशा आता निर्णायक वळणावर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केल्याने आंदोलन पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर उद्या, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी प्रत्येक गावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीत मुंबईकडे कधी आणि कोणत्या मार्गाने कूच करायचे, आंदोलनाची पुढील रणनीती काय असणार आणि आगामी लढ्याची दिशा कोणती असेल, याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या निर्धारामुळे आता उद्याची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील या बैठकीतून नेमका कोणता निर्णय समोर येतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबईकडे कूच होणार की आंदोलनाला नवे वळण मिळणार? उद्याच्या बैठकीत याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

— अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी