विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त अंभईत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; प्रवेश पूर्णतः मोफत

विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त अंभईत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; प्रवेश पूर्णतः मोफत
विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त अंभईत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; प्रवेश पूर्णतः मोफत

महाराष्ट्र वाणी

अंभई : (प्रतिनिधी) दि ९ :- विघ्नहर्ता हॉस्पिटल, अंभई यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त तसेच गणेशोत्सवाचे औचित्य साधून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय वक्तृत्व स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांना आपली कला आणि बुद्धिमत्ता सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, या सर्व स्पर्धांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे.

माहितीपत्रकात नमूद केलेल्या गटांनुसार विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. परिसरातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत विघ्नहर्ता हॉस्पिटलने 'एक दिवस गावासाठी' हा उपक्रमही सुरू केला आहे. या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेला विघ्नहर्ता हॉस्पिटल, अंभई येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

स्पर्धा तसेच आरोग्य तपासणी उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल, अंभई येथे संपर्क साधावा.

🏥 विघ्नहर्ता हॉस्पिटल, अंभई

ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर

📞 संपर्क : 9545352129 / 9421406143

👨🏻‍⚕️ डॉ. विजय तेजराव सोनवणे

👩🏻‍⚕️ डॉ. वर्षा विजय सोनवणे