एमआयएमची औरंगाबाद मध्यात नवी दमदार टीम; जीशान देशमुख शहराध्यक्ष, मुसेफ कुरेशी कार्याध्यक्ष

एमआयएमची औरंगाबाद मध्यात नवी दमदार टीम; जीशान देशमुख शहराध्यक्ष, मुसेफ कुरेशी कार्याध्यक्ष

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- एमआयएमने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघासाठी नव्या शहर कार्यकारिणीची घोषणा करत संघटनात्मक बांधणीला नवी दिशा दिली आहे. युवा नेते जीशान मुकीम देशमुख यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, मुसेफ कुरेशी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली २९ पदाधिकाऱ्यांची नवी टीम पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.

हज हाऊसच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात एमआयएमच्या जंबो शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि पेन प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या जीशान मुकीम देशमुख यांच्याकडे औरंगाबाद मध्यच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुसेफ कुरेशी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांची टीम पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला प्रदेश पदाधिकारी प्रभाकर पारधे, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान, युवा जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.