इकरा थीम कॉलेजमध्ये ‘मिशन यूपीएससी’ अंतर्गत मार्गदर्शनपर चर्चासत्र

इकरा थीम कॉलेजमध्ये ‘मिशन यूपीएससी’ अंतर्गत मार्गदर्शनपर चर्चासत्र

महाराष्ट्र वाणी

जळगाव (प्रतिनिधी) दि ९ :- इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरुण येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत ‘मिशन यूपीएससी’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सलार होते. प्रमुख पाहुण्या म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. सुरेखा पालवे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. हारून बशीर, कय्युम शाह, प्रा. इरफान शेख, प्राचार्य डॉ. वकार शेख, उपप्राचार्य डॉ. तनवीर खान व उपप्राचार्या डॉ. अंजली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुझम्मिल नदवी यांच्या कुराण पठणाने झाली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. प्रमुख पाहुण्या डॉ. सुरेखा पालवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सलार यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात स्पष्ट ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाच्या माध्यमातून यश संपादन करावे, असे सांगितले.

यावेळी डॉ. इरफान शेख यांनी ‘यूपीएससी म्हणजे काय?’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्हिडिओ दाखवून त्यांचा उत्साह वाढवला. तर डॉ. हारून बशीर यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या व्यावहारिक पद्धती आणि नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रा. डॉ. चांद खान, प्रा. डॉ. युसुफ पटेल, प्रा. डॉ. अमीन काझी, प्रा. डॉ. इरफान शेख आणि प्रा. डॉ. फिरदोस शेख यांची विशेष उपस्थिती होती.

चर्चासत्राच्या आयोजनासाठी प्रा. उमर पठाण, प्रा. मुस्तकिम बागवान, प्रा. रफिक खतिक, प्रा. केतन शिंरतुरे, प्रा. मुदस्सीर, प्रा. मुबश्शिर, डॉ. कहकशां आणि डॉ. शबाना खटीक यांनी विशेष परिश्रम घेतले.

या चर्चासत्रासाठी २०५ विद्यार्थ्यांनी अधिकृत नोंदणी केली होती. कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.