"दारूबंदीची घात, बहिणींचा उध्वस्त संसार!" – महायुती सरकारच्या धोरणावर महाविकास आघाडीचा तीव्र हल्लाबोल

“लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणारा निर्णय” ठरवत आघाडीच्या आमदारांनी आक्रमक घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला

"दारूबंदीची घात, बहिणींचा उध्वस्त संसार!" – महायुती सरकारच्या धोरणावर महाविकास आघाडीचा तीव्र हल्लाबोल
"दारूबंदीची घात, बहिणींचा उध्वस्त संसार!" – महायुती सरकारच्या धोरणावर महाविकास आघाडीचा तीव्र हल्लाबोल

महाराष्ट्र वाणी 

मुंबई (प्रतिनिधी) दि१५ जुलै :- राज्य सरकारच्या दारूबंदी शिथिल करण्याच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन छेडलं. १९७२ पासून बंदी असलेल्या दारू दुकानांच्या परवान्यांना मंजुरी देणाऱ्या महायुती सरकारच्या धोरणाला “लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणारा निर्णय” ठरवत आघाडीच्या आमदारांनी आक्रमक घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. “महसूल वाढवण्यासाठी जनजीवन बिघडवणाऱ्या निर्णयाला सरकारने मूठमिठाची मान्यता दिली आहे. बाटलीवाल्यांचा आणि दलालांचा फायदा करून देणारे हे सरकार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

“दारूला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… दारूवाल्या सरकारचा धिक्कार असो!” अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार रस्त्यावर उतरले. महिला, तरुण पिढी आणि कुटुंबसंस्था यावर होणाऱ्या परिणामांची सरकारने दखल घ्यावी, अशी आघाडीची जोरदार मागणी आहे.

सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा आघाडीने दिला आहे.

 शेवटी एवढंच म्हणता येईल : दारूचं धोरण लाथाडा, जनतेचा आवाज ऐका!