चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन; अण्णा बनसोडे यांचा भव्य सत्कार

चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन; अण्णा बनसोडे यांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, दि. 9 जून (प्रतिनिधी - शंकर जोग):

चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विधानसभेचे उपसभापती आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. यानिमित्ताने आमदार अण्णा बनसोडे यांचा चर्मकार समाजाच्या वतीने पगडी, शाल, पुष्पगुच्छ आणि संत रोहिदास महाराज यांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सल्लागार उर्मिला ठाकरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे, प्रदेश उपाध्यक्ष अंकुश आंबेकर, प्रदेश संघटक दत्तात्रय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष दिनेश जाधव, युवक पुणे शहर अध्यक्ष विकास सोनवणे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

चर्मकार समाजाने मागण्यांसाठी विविध आंदोलने व मोर्चे आयोजित केले होते. मात्र अद्याप शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. यासंदर्भात विधानसभेत ठोस आवाज उठवून समाजाच्या मागण्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे यांनी व्यक्त केली.