एच. जे. थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

एच. जे. थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
एच. जे. थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

महाराष्ट्र वाणी

जळगाव दि १३ :- एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे स्वच्छता पखवाड्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासोबतच महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. इरफान शेख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. हाफिज शेख, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरदौस शेख, डॉ. तनवीर खान, डॉ. कुलकर्णी, डॉ. चांद खान, प्रा. राजू गवरे आणि डॉ. अमीन काझी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून युवा पिढीने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला.