९ सप्टेंबर ‘मुस्लिम ओबीसी सामाजिक न्याय दिवस’ म्हणून घोषित करण्याची मागणी; स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

९ सप्टेंबर ‘मुस्लिम ओबीसी सामाजिक न्याय दिवस’ म्हणून घोषित करण्याची मागणी; स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
९ सप्टेंबर ‘मुस्लिम ओबीसी सामाजिक न्याय दिवस’ म्हणून घोषित करण्याची मागणी; स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्र वाणी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- मुस्लिम ओबीसी, पसमांदा, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी, सामाजिक न्यायासाठी तसेच समान संधीच्या हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे स्वर्गीय शब्बीर अहमद अन्सारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांचा जन्म ९ सप्टेंबर १९४९ रोजी झाला होता, तर त्यांचे २२ मार्च २०२६ रोजी निधन झाले. मुस्लिम ओबीसी, पसमांदा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष सामाजिक न्यायाच्या चळवळीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या संघर्षाची, विचारांची आणि सामाजिक न्यायाच्या वारशाची आठवण कायम राहावी, यासाठी ९ सप्टेंबर हा दिवस ‘मुस्लिम ओबीसी सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा आणि या दिवसाला शासकीय स्तरावर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हा दिवस केवळ स्मरणाचा दिवस नसून मुस्लिम ओबीसी, पसमांदा, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या ओळखीचा, अधिकारांचा, सामाजिक न्यायाचा आणि समान संधीचा संकल्प असल्याचेही या मागणीच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.

स्व. शब्बीर अहमद अन्सारी यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाचा आवाज महाराष्ट्रातून संपूर्ण देशभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय प्रवक्ते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी दिली.