अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावा – युवा प्रतिष्ठानची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे (दि. १८ जुलै) :– साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय अवचिते, प्रशांत नेटके, रुपेश खिलारे, गणेश खरात, हितेश काळोखे, राजू वैराट, देवेंद्र गोरखे, चेतन गायकवाड, गणेश अवचिते, ऋतिक अवचिते, वैष्णव जाधव, मयूर गायकवाड, अक्षय गाडे, संकेत आवळे आदी उपस्थित होते.
यावेळी भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी ठाम मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
लोकशाहीरांचा सन्मान, देशाचे अभिमान!