फुलंब्रीचे पत्रकार अकबर शहा यांना ‘ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026’; नगरसेवक जावेद खान पठाण यांच्या हस्ते सत्कार

फुलंब्रीचे पत्रकार अकबर शहा यांना ‘ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026’; नगरसेवक जावेद खान पठाण यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र वाणी

फुलंब्री दि ३१ :- फुलंब्री येथील धडाडीचे पत्रकार अकबर शहा यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल नाशिक येथे आयोजित सोहळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

या गौरवप्राप्तीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथे वार्ड क्रमांक 6 चे नगरसेवक मा. जावेद खान पठाण यांच्या पुढाकारातून अकबर शहा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पहार, शाल आणि भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला कट्टर शिवसैनिक मा. सुशिल जैस्वाल, सागर भाऊ शेरकर, रईस पटेल, इलियास पठाण, रफीक सय्यद, बंटी जाधव तसेच ठमाजी द्वारकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी अकबर शहा यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अकबर शहा यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानत, “हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, पुढेही समाजहिताच्या बातम्या निर्भीडपणे मांडत राहीन,” असे सांगितले.

 “सत्याला शब्द देणाऱ्या लेखणीचा सन्मान… पत्रकारितेतील हीच खरी ताकद!”