राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी योगेश घुगे; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी मा. योगेश मच्छिंद्र घुगे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी योगेश घुगे प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, याच कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट)चे पंकज पिसे, कैलास फरकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी भवनचे विश्वस्त विजय अण्णा बोराडे, द्वारका भाऊ पाथरीकर, शहराध्यक्ष ख्वाजा भाई, शहरकार्याध्यक्ष आशिष पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण तांबे यांच्यासह आनंद मगरे, सचिन जाधव, गौरव महालकर, प्रकाश साळुंखे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.