अंभई–भराडी मार्गावरील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! बोजगावच्या धोकादायक वळणाला अखेर ‘वाट’ मिळाली; वाहनधारकांना मोठा दिलासा!

महाराष्ट्र वाणी

अंभई/ सिल्लोड दि ६ :- अंभई–भराडी मार्गावरील बोजगाव येथील धोकादायक वळणामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अरुंद आणि धोकादायक वळणामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच दुचाकीस्वार आणि मोठ्या वाहनचालकांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.

मात्र, नागरिकांच्या या समस्येची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसीम देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.

आज या धोकादायक वळणाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने आवश्यक काम करून रस्ता अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्थानिक नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले असून, अनेक दिवसांपासून या धोकादायक वळणामुळे निर्माण झालेली समस्या आता काही प्रमाणात दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

🚧 रस्ता सुरक्षित असेल, तर प्रवासही सुरक्षित होईल!

नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित अशा समस्या वेळेत सोडविल्या गेल्यास संभाव्य अपघात टाळण्यास निश्चितच मदत होऊ शकते.

अंभई–भराडी मार्गावरील बोजगाव येथील या धोकादायक वळणावर करण्यात आलेल्या कामामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

🎤 महाराष्ट्र वाणी न्यूजसाठी... अखलाख देशमुख