पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं सेवा कार्य; वडगाव शेरीत वारकऱ्यांना चहा-लाडू वाटप

पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं सेवा कार्य; वडगाव शेरीत वारकऱ्यांना चहा-लाडू वाटप

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, दि. २१ जून :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा पुण्यात मुक्काम असताना वडगाव शेरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी उद्योग सेलच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर उपाध्यक्ष अभिजीत शहा यांच्या हस्ते वारकऱ्यांना सकाळी चहा, राजगिरा लाडू, बिस्किट आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या.

या सेवाकार्यात अ‍ॅड. विक्रम दौंडकर, राहुल दौंडकर, हर्षद जाधव, सुजल शहा, पार्श्व शहा, राखी शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्याचा संकल्प या उपक्रमातून दिसून आला.

अनेक वारकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.