लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना भक्कम पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला पाठबळ देण्यासाठी लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बँकेच्या संचालक मंडळाने डॉ. पाटील यांना भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन भाई, बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव, उपाध्यक्ष श्रीमंत उकिर्डे पाटील, माजी आमदार कैलास पाटील, कृष्णा पाटील डोणगावकर, जुबेर मोतीवाला यांच्यासह बँकेचे सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा दर्शविला.
अकील पटेल यांची माहिती
लोकविकास नागरी सहकारी बँकेचे संचालक अकील पटेल यांनी या बैठकीची माहिती दिली. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी संचालक मंडळाने एकजुटीने पाठिंबा दर्शविल्याने त्यांच्या प्रचाराला बळ मिळणार असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट झाले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित