बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर; युसूफ शेख यांच्याकडे जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून लोकसभा, जिल्हा आणि विधानसभा प्रभारींच्या नियुक्त्या
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी आणि विधानसभा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून, श्री. युसूफ शेख यांच्याकडे बुलडाणा जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे. हे पत्र बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील अवचार यांना पाठविण्यात आले आहे.
या नियुक्त्यांनुसार बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी अॅड. संदीप पाटील यांची लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यासाठी युसूफ शेख यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठीही प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा नियुक्त्यांमध्ये समावेश आहे. तसेच रावेर मतदारसंघासाठीही प्रभारींचे नाव पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेच्या कामाला गती देणे, पक्षाचा जनसंपर्क वाढविणे आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित