सिल्लोड तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा; गावोगावी जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

सिल्लोड तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा; गावोगावी जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
सिल्लोड तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा; गावोगावी जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

सिल्लोड/प्रतिनिधी दि १ :- दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यात प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह, सिल्लोड येथे दुष्काळ व पाणीटंचाई निवारणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस तहसीलदार वाघमारे, गटविकास अधिकारी (वर्ग-१) रत्नाकर पगार आणि तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक गावात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

तसेच आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करणे, आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे, विहिरी अधिग्रहित करणे तसेच अन्य उपाययोजनांचे नियोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस सिल्लोड तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित